पुरंदर तालुक्यात 'दुहेरी' हत्याकांडाने खळबळ; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

 सासवड : पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे एका वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नमाला मोहन धिवार (वय ७२) आणि मोहन बाबुराव धिवार (वय ८३), अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात एका २७ वर्षीय व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                 पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या घराजवळ राहणाऱ्या गणेश सुभाष धिवार (वय २७, रा. पानवडी) याच्याशी काही दिवसांपूर्वी गायी-बैल नेण्यावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या आई-वडिलांवर धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.  ही घटना २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.२० वाजण्यापूर्वी पानवडी गावच्या हद्दीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी पहाटे २.२९ वाजता सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा क्रमांक ५३८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सासवड पोलीस  करीत आहेत.





Post a Comment

0 Comments