जेजुरीतील खाद्यप्रेमींसाठी नवा पर्याय ‘भोसले फार्म फॅमिली रेस्टॉरंट’चे थाटात उद्घाटन

 जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे आणि नगराध्यक्ष जयदिप बारभाई यांच्या हस्ते उद्घाटन

                           जेजुरी ( प्रतिनिधी ) : पुणे-पंढरपूर महामार्गावर जेजुरी परिसरातील पेशवे पेट्रोलपंपाशेजारी सुरू करण्यात आलेल्या ‘हॉटेल भोसले फार्म फॅमिली रेस्टॉरंट’चा भव्य शुभारंभ शनिवार , दि. २४ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे आणि जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदिप बारभाई यांच्या हस्ते फीत कापून रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आले.



                      या उद्घाटन सोहळ्याला जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार , जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता दुर्गाडे,  मार्तंड देवस्थानचे विश्वस्त पोपट खोमणे, सुभाषमामा दरेकर, नगरसेवक योगेश जगताप, रमेश लेंडे, भक्ती कोरफड, अमिनाताई पानसरे, मेघाताई उबाळे, स्नेहलताई भालेराव,  ॲड.धनंजय भोईटे,  सुभाष दुर्गाडे, राहुल भोसले,  पत्रकार शिवराज झगडे, प्रल्हाद गिरमे,  निलेश जगताप, गिरीश झगडे, देविदास झगडे,  वैभव कोरफड, रवींद्र हिंगणे, राजू पानसरे, सनी झगडे, शहाजी सूर्यवंशी, अमोल हरपळे, गोविंद भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते  शैलजा भोसले, राजेंद्र भोसले आणि उद्योजक काशिनाथ इंगळे यांचीही उपस्थिती होती.

                           जेजुरी हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून, येथे खंडोबा दर्शनासाठी तसेच पुणे-पंढरपूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांना कुटुंबासह भोजनाचा आनंद घेण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भोसले फार्म फॅमिली रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे.

              उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नूतन व्यवसायासाठी भोसले परिवाराचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ॲड.अशोक भोसले , अमृता भोसले , भूषण आनंद भोसले व भोसले परिवाराच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या रेस्टॉरंटच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.






Post a Comment

0 Comments